Ad will apear here
Next
सीएम चषकच्या अंतिम सामन्यांना सुरुवात
मुंबई : महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वांत मोठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या सीएम चषकचे राज्यस्तरीय अंतिम सामने मुंबई, अहमदनगर आणि पुण्यात पार पडतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून एकूण ४५ लाखांहून अधिक स्पर्धकांनी सीएम चषकच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष, आमदार योगेश टिळेकर आणि मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या नेतृत्वात सीएम चषकच्या समारोपाची तयारी सुरू आहे. क्रिकेटचा राज्यस्तरीय अंतिम सामना अहमदनगरमध्ये २९ जानेवारी २०१९ रोजी सुरू झाली. सीएम चषकाच्या सांगता सोहळ्यात तीन फेब्रुवारीला युवा महासंगमचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील सुमारे ३५ हजारांहून जास्त तरुण-तरुणी सहभागी होतील.

सीएम चषक स्पर्धेत क्रीडा आणि सांस्कृतिक अशा एकूण १२ स्पर्धांमध्ये गाव, गल्ली आणि सोसायट्यांसह प्रत्येक शाळा, कॉलेज आणि विधानसभा, तसेच जिल्हास्तरांवर आठ लाख दोन हजार ७१ सामने आयोजित केले. या स्पर्धा एकूण एक लाख ९१ हजार ९११ तासांपर्यंत चालल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरासरीने १५ हजार स्पर्धकांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यात राज्यस्तरावर एकूण ३७ हजार स्पर्धक विजेते घोषित झाले. जिल्हास्तरावर पाच हजार स्पर्धक विविध स्पर्धामध्ये विजेते झाले. राज्यस्तरावर एकूण १२९ विजेते घोषित होतील. स्पर्धेच्या अंतिम समारोप सोहळ्यात महाराष्ट्र स्तरावरच्या विजेत्यांना २८ लाखांची पारितोषिके प्रदान केली जातील.

या विषयी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष टिळेकर म्हणाले, ‘सीएम चषकमधील क्रिकेटचे राज्यस्तरीय अंतिम सामने २९ ते ३१ जानेवारीपर्यंत अहमदनगरमध्ये आणि कुस्तीचे राज्यस्तरीय सामने पुण्यात ३१ जानेवारीला होतील. व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, कॅरम, ऍथलेटिक्स, रांगोळी, पेंटिंग, गायन आणि नृत्य स्पर्धांचे अंतिम सामने दोन व तीन जानेवारीला मुंबईत होतील. या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीतल्या सामन्यांसाठी मुंबई, अहमदनगर आणि पुण्यात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सांगता सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ३५ हजारांहून जास्त तरुण-तरुणी भाग घेण्यासाठी मुंबईत येतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZGVBW
Similar Posts
‘सीएम चषका’मध्ये १४ लाख लोकांचा सहभाग मुंबई : महाराष्ट्रातील सर्वांत मोठी क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषका’ला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत १४ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) आयोजित ‘सीएम चषका’ला प्रदेशस्तरावर उत्तम प्रतिसाद मिळत असून, मुंबई
सीएम चषक युवा महासंगम तीन फेब्रुवारीला मुंबईत मुंबई : ‘राज्यातील ४३ लाख युवांचा सहभाग असलेल्या ‘सीएम चषक’ या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा मुंबई, पुणे व अहमदनगर येथे मंगळवारी सुरू झाली. मुंबईत तीन फेब्रुवारी रोजी युवा महासंगम आयोजित करण्यात आला असून, त्यात ५० हजार युवक-युवती सहभागी होणार आहेत
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language